नवी दिल्ली : गोवा येथे 14 ते 17 ऑक्टोबर दरम्यान ब्रिक्स देशांचं संम्मेलन होणार आहे यामध्ये रशियाचे राष्‍ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे देखील सहभागी होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदी यांच्यासोबत पुतीन हे 17 व्या भार-रशिया समिटचं देखील आयोजन करणार आहेत. यामध्ये पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यात दहशतवादाच्या मुद्द्यावर महत्त्वपूर्ण चर्चा आणि काही महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.


पुतीन यांनी याआधीच भारताचं विविध मुद्द्यांवर समर्थन देखील केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुतीन यांच्याशी चांगले संबंध आहते. सर्जिकल स्ट्राईकचं समर्थन देखील पुतीन यांनी केलं होतं आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर ते भारताच्या सोबत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे पाकिस्तानला याच मुद्द्यावर घेरण्यासाठी याची मदत होऊ शकते.