सर्कसमध्ये सिंहाने जबड्यात पकडले रिंगमास्टरला
सर्कसमधील सिंह हे पाळीव असतात, रिंग मास्टरचे सर्व म्हणणे ऐकतात. पण या पिंजऱ्यात रिंग मास्टरवर सिंहाने हल्ला केला हे तुम्ही कधी पाहिलं का....
डाऊलेंस (फ्रान्स ) : सर्कसमधील सिंह हे पाळीव असतात, रिंग मास्टरचे सर्व म्हणणे ऐकतात. पण या पिंजऱ्यात रिंग मास्टरवर सिंहाने हल्ला केला हे तुम्ही कधी पाहिलं का....
असाच काहीसा प्रकार फ्रान्समधील डाऊलेंस शहरात घडला. येथे बफेलो सर्कसमध्ये रिंग मास्टर सिंहाला हंटरने घाबरवत होता. तेवढ्यात सिंह चिडला आणि त्याने थेट रिंग मास्टरची मानच पकडली.
यावेळी प्रेक्षकात उपस्थित असलेल्या प्रेक्षकाने हा भयंकर प्रसंग आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आणि फेसबूकवर शेअर केला.
व्हिडिओ शेअर करणारा व्यक्ती म्हणतो की हा प्रकार पाहून आता माझ्या मुलीला सर्कसची भीती वाटते आहे.
सिंहाने रिंगमास्टरला पकडल्यावर प्रेक्षकांमध्ये खळबळ माजली आणि लोग पळू लागले.
पाहा हा भयंकर व्हिडिओ...