दीड वर्षात महिला झाली १३ मुलांची आई

जगात अनेक आश्चर्यकारक घटना नेहमी समोर येत असतात. अशीच एक घटना मँचेस्टरमध्ये देखील समोर आली आहे. ज्यामुळे तुम्हाला एकूण धक्का बसेल.
मुंबई : जगात अनेक आश्चर्यकारक घटना नेहमी समोर येत असतात. अशीच एक घटना मँचेस्टरमध्ये देखील समोर आली आहे. ज्यामुळे तुम्हाला एकूण धक्का बसेल.
एक महिला ही फक्त दीड वर्षामध्ये १३ मुलांची आई बनल्याची घटना समोर आली आहे. पण नंतर तपासात हे सगळं खोटं असल्याचं समोर आलं. महिलेने १३ मुलांची आई असल्याचं दाखवलं कारण तिला टॅक्स क्रेडीट मिळवायचं होतं.
रेबेका जोन्स या महिलेने पैशांसाठी १३ खोट्या मुलांची आई असल्याचं दाखवलं. ज्यामध्ये 3 जुळ्या मुलांचा ही समावेश आहे. महिलेने ७ मुलांना दाखवून या आधी जवळपास १० लाखांचा नफा देखील कमावला होता. पण मुलांच्या जन्मतारीखेवरून अधिकाऱ्यांना संशय़ आला आणि हे प्रकरण उघडकीस आलं.