महिला उद्योगपतीने जेव्हा मुलगा समजून त्याला कड्यावर घेतलं
लहान मुलगा दिसला की कोणीही त्याला सहज उचलून घेतं. पण वियतनाममध्ये अमेरिकेची प्रसिद्ध महिला उद्योगपती मिशेल मूनला एका मुलाला उचलून घेणं थोडं विचित्र गोष्ट ठरली आहे.
हनोई : लहान मुलगा दिसला की कोणीही त्याला सहज उचलून घेतं. पण वियतनाममध्ये अमेरिकेची प्रसिद्ध महिला उद्योगपती मिशेल मूनला एका मुलाला उचलून घेणं थोडं विचित्र गोष्ट ठरली आहे.
मिशेल मून हिने याबाबत ट्विटरवर खुलासा केला आहे. मिशेल मून एका कार्यक्रमात बोलत होती त्यावेळेस जवळपास ३०००० लोकांसमोर एक हसू आणणारी गोष्ट घडली.
मिशेल मून जेव्हा स्टेजवर होती तेव्हा एक लहान मुलगा पुष्पगुच्छ घेऊन मिशेलकडे आला आणि तिला तो दिला यानंतर मिशेलने त्या मुलाला उचलून घेतलं. पण यानंतर जे घडलं ते मिशेलसाठी देखील धक्कादायकच होतं.
मिशेल मून त्या मुलाला कड्यावर घेवून सेल्फी काढू लागली आणि अचानक एका महिलेचा आवाज आला की ते माझे पती आहे. हे ऐकून मिशेलचं डोळे उंचावले. कारण तो मुलगा एक ४६ वर्षाचा व्यक्ती होता. ज्याची उंची ही कमी होती.