इमारतीवरुन मारली उडी, केसांना पकडून पतीने वाचवलं
चीनमधील शानक्सीमध्ये राहणाऱ्या एका दांम्पत्यासोबत असं काही घडलं की सगळेच हैराण झाले. एका ३० वर्षीय महिलेचा तिच्या पतीसोबत वाद झाला. पण हा वाद इतक्या टोकाला गेला की पत्नी ७ माळ्यांची इमारतीच्या टॅरेसवर गेली आणि तेथून उडी मारली.
शानक्सी : चीनमधील शानक्सीमध्ये राहणाऱ्या एका दांम्पत्यासोबत असं काही घडलं की सगळेच हैराण झाले. एका ३० वर्षीय महिलेचा तिच्या पतीसोबत वाद झाला. पण हा वाद इतक्या टोकाला गेला की पत्नी ७ माळ्यांची इमारतीच्या टॅरेसवर गेली आणि तेथून उडी मारली.
पत्नीने उडी मारताच पतीने महिलेच्या केसांना धरलं. पत्नीला वाचवण्यासाठी पतीने खूप प्रयत्न केले. ३ मिनिटं पतीने पत्नीला केसांच्या आधारे धरुन ठेवलं. त्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसाच्या मदतीने त्या महिलेला वाचवण्यात आलं.