अजब-गजब : 10 वर्षांच्या मुलाचं वजन तब्बल 192 किलो!
इंडोनेशियामध्ये एक 10 वर्षांचा मुलगा सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनलाय. आर्य परमाना असं या मुलाचं नाव आहे...
इंडोनेशिया : इंडोनेशियामध्ये एक 10 वर्षांचा मुलगा सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनलाय. आर्य परमाना असं या मुलाचं नाव आहे...
आर्य 10 वर्षांचा असला तरी त्याचं वजन मात्र तब्बल 192 किलो आहे. त्यामुळेच, त्याला जगातील सर्वांत वजनदार मुलगा समजलं जातंय.
पालक चिंतेत
इंडोनेशियाच्या चिपुरवासारी गावात आर्य आणि त्याचे कुटुंबीय राहतात. आर्यच्या वाढत्या वजनानं त्याचे आई-वडीलही हैराण आहेत. त्यांनी आर्यला क्रॅश डाएटवर टाकलंय. या वजनामुळे आपल्या मुलाच्या जीवाला धोका आहे, हे आता त्यांच्या लक्षात आलंय. त्यामुळे, सध्या त्याला केवळ लाल भात खायला दिला जातोय. आत्तापर्यंत आर्य पाच वेळा जेवण घेत होता... त्याचं एका वेळेचं अन्न दोन वयस्कर लोकांच्या भोजनाबरोबर होतं.
वजनानं चालणं-फिरणं केलं बंद
जन्माच्या वेळी आर्यचं वजन इतर सामान्य मुलांप्रमाणेच 3.2 किलो होतं. पण, दोन वर्षांनंतर मात्र आर्यचं वजन अचानक वाढू लागलं... आणि आता तर त्याचं वजन प्रमाणाच्या बाहेर वाढलंय. आर्यच्या शरीराचा आकाराही इतका अवाढव्य झालाय की त्याचे आकाराचे कपडेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे, तो फक्त एक चादर लपेटून आहे. त्याचं शाळेत जाणंही यामुळे बंद झालंय.
गरिबी येतेय आड
आर्यचं वजन अचानक का वाढलं? यासाठी कोणता आजार कारणीभूत आहे? हे काही स्थानिक डॉक्टरांच्या लक्षात येत नाहीय. त्यामुळे त्याला मोठ्या शहरात हलवणं गरजेचं आहे... पण, त्याच्या गरीब आईवडिलांकडे शहरात जाऊन आर्यवर उपचार करण्याइतके पैसेही नाहीत, त्यामुळे ते मोठ्या अडचणीत सापडलेत.