मुंबई : संपूर्ण भारतभर प्रदर्शित झालेल्या 'बाहुबली २ : द कन्क्लूजन' या सिनेमानं प्रेक्षकांना वेड लावलंय. भारतासहीत हा सिनेमा जगभर प्रदर्शिक करण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या काही खास गोष्टींसाठी हा सिनेमा ओळखला जातोय. परदेशातील सिने परिक्षकांनीही हा सिनेमा म्हणजे 'भारतातला आजवरचा सर्वोत्कृष्ठ सिनेमा' म्हणत हा सिनेमा उचलून धरलाय. 


सिनेमाच्या खास १२ गोष्टी...


- या सिनेमाचं एकूण बजेट २७० करोड रुपये असल्याचं म्हटलं जातंय


- हा सिनेमा जगभरात जवळपास ९००० स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आलाय


- या सिनेमाला भारतात ६५०० आणि परदेशात २५०० स्क्रीन्स मिळाल्यात


- 'बाहुबली २'ला अमेरिकेत ११०० स्क्रीन्स मिळाल्यात. कॅनडामध्ये ८० हून जास्त जागांवर जवळपास १५० स्क्रीन्स मिळाल्यात


- न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि फिजी आयलँडस मध्ये हा सिनेमा हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्यात आलाय.... आणि प्रेक्षकांकडून त्याला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय


- प्रदर्शनापूर्वीच या सिनेमानं ५०० करोड रुपयांची कमाई केलीय. ही कमाई थिएट्रिकल राईटसच्या साहाय्यानं करण्यात आलीय


- एका रिपोर्टनुसार, सिनेमाचं हिंदी वर्जनचे राईटस १२० करोड तर तेलुगु वर्जनचे राईटस १३० करोड रुपयांना विकले गेलेत


- तमिळनाडूमध्ये या सिनेमाचे राईटस् ४७ करोड रुपयांना विकण्यात आलेत


- केरळमध्ये डिस्ट्रीब्युशन राईटमधून या सिनेमानं १० करोड आणि कर्नाटकातून ४५ करोडोंची कमाई केलीय


- सिनेमाच्या हिंदी वर्जनचे सेटेलाईट राईटस् ५१ करोड रुपयांना सोनीनं खरेदी केलेत. सिनेमाचे तेलगु वर्जन २६ करोड रुपयांना विकले गेलेत


- 'बाहुबली'च्या पहिल्या भागाचे सर्व वर्जन सेटेलाईट राईटस् ४५ करोड रुपयांना विकले गेले होते.