मुंबई: रणवीर सिंग आणि वाणी कपूर सध्या बेफिक्रेचं शूटिंगसाठी पॅरिसमध्ये आहेत. या दोघांचे चित्रपटामध्ये 23 किसिंग सीन असल्याचं बोललं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणवीर सिंगनं काहीच दिवसांपूर्वी बेफिक्रेचा फर्स्ट लूक शेअर केला होता. या फोटोमध्येही रणवीर-वाणी किस करताना पाहायला मिळत आहेत. 


जर या चित्रपटामध्ये 23 किसिंग सीन असतील तर बॉलीवूड चित्रपटातला हा रेकॉर्ड असेल. याआधी ख्वाईश चित्रपटामध्ये मल्लिका शेरावत आणि हिमांशू मलिकचे 17 किसिंग सीन होते. 


आदित्य चोप्रा बेफिक्रेचा दिग्दर्शक आहे. याआधी त्यानं 8 वर्षांपूर्वी म्हणजेच 2008 मध्ये रब ने बना दी जोडीचं दिग्दर्शन केलं होतं.