एका सिनेमासाठी `त्या` 3 कपूर महिला एकत्र
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरची बहिण रिया कपूर, एकता कपूर सोबत `वीरे दी वेडिंग` हा सिनेमा बनवणार आहे. सिनेमामध्ये सोनम कपूर, करीना कपूर आणि स्वरा भास्कर मुख्य भूमिकेत आहेत. `वीरे दी वेडिंग`ची शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. करीना, सोनम आणि रिया या कपूर अभिनेत्री नुकत्याच एकत्र भेटल्या होत्या. त्याचा फोटो त्यांनी शेअर केला आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरची बहिण रिया कपूर, एकता कपूर सोबत 'वीरे दी वेडिंग' हा सिनेमा बनवणार आहे. सिनेमामध्ये सोनम कपूर, करीना कपूर आणि स्वरा भास्कर मुख्य भूमिकेत आहेत. 'वीरे दी वेडिंग'ची शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. करीना, सोनम आणि रिया या कपूर अभिनेत्री नुकत्याच एकत्र भेटल्या होत्या. त्याचा फोटो त्यांनी शेअर केला आहे.
सोनम अमेरिका बेस्ड एक कॉलेज विद्यार्थिनी आहे. ती एका विद्यार्थिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाची इंडियाना यूनिवर्सिटीमध्ये शूटिंग सुरु असल्याची चर्चा आहे. करीना कपूर ऑक्टोबरपासून सिनेमाच्या शुटींगला सुरुवात करणार आहे. करीना गरोदर आहे त्यामुळे मध्ये ब्रेक घेऊन डिलीव्हरी झाल्यानंतर ती पुन्हा शूटिंग करणार आहे.
करीनाने म्हटलं होतं की, 'वीरे दी वेडिंग' हा देशातला पहिला तरुणींचा सिनेमा असणार आहे. या सिनेमाच्या निर्मात्या देखील 2 महिला असल्याचं देखील तिने म्हटलं होतं.