दिल दोस्तीच्या मित्रांची गोव्यात फुल्ल टू धमाल
दिल दोस्तीचा दुसरा पार्ट अर्थात दिल दोस्ती दोबारा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आलीये. खयाली पुलाव या भन्नाट नावाचे हॉटेल चालवणारे हे सहा मित्र आणि हे हॉटेल चालवताना होणारे धम्माल किस्से यावर आधारित ही मालिका आहे.
मुंबई : दिल दोस्तीचा दुसरा पार्ट अर्थात दिल दोस्ती दोबारा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आलीये. खयाली पुलाव या भन्नाट नावाचे हॉटेल चालवणारे हे सहा मित्र आणि हे हॉटेल चालवताना होणारे धम्माल किस्से यावर आधारित ही मालिका आहे.
या मालिकेतील टायटल साँग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेय. त्यानंतर आता दिल दोस्ती दोबारामधील गँगचं गोव्यात शूट झालेलं टायटल ट्रॅक तुमच्या भेटीला आलंय.
नक्कीच हे गाण तुम्हाला आवडेल. पाहा गोव्यात या सहा मित्रांनी केलेली धम्माल