बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्यांची झोप उडाली, ६० टक्के व्यवहार ब्लॅकमध्ये...
बॉलिवूडच्या A श्रेणीच्या अर्थातच आघाडीच्या कलाकारांची मोदींनी नोटा बंद करण्याचा निर्णयाने झोप उडाली आहे.
मुंबई : बॉलिवूडच्या A श्रेणीच्या अर्थातच आघाडीच्या कलाकारांची मोदींनी नोटा बंद करण्याचा निर्णयाने झोप उडाली आहे.
बहुतांशी कलाकारांची सिनेमांसोबतच इतर ब-याच माध्यमांतून कमाई होत असते. अवार्ड फंक्शन्स, लग्नसोहळे आणि प्रायव्हेट इव्हेंट्समध्ये परफॉर्म करुन हे स्टार्स रग्गड कमाई करत असतात.
एखाद्या इव्हेंटमध्ये सादरीकरण करण्यासाठी हे स्टार्स 25 लाख ते 1 कोटींच्या घरात मानधन घेत असतात. यापैकी 60% कलाकार 40 ते 50% पैसे हे कॅशमध्ये घेतात. जर एखाद्या सेलिब्रिटीचे मानधन 75 लाख रुपये असेल, तर त्यापैकी 25 ते 35 लाखांच्या घरात ते रोख रक्कम घेतात. ही रक्कम 500 आणि 1000 च्या नोटांच्या रुपात असते.
एक इव्हेंट ऑर्गनाइजरने सांगितले, की या बातमीनंतर अनेक सेलिब्रिटीजने त्यांचे इव्हेंट्स लांबणीवर टाकले आहेत. काही सेलिब्रिटींनी पहिलेच कमिटमेंट दिल्याने ते मानधन कशा स्वरुपात स्वीकारणार यावर पुन्हा बोलणी करणार आहेत.
काही सेलिब्रिटीजनी पेमेंट होल्डवर ठेवले आहे. इतकेच नाही तर साइड अभिनेते आणि आयटम गर्ल्ससुद्धा अडचणीत आल्या आहेत. एका इव्हेंट ऑर्गनाइजरने सांगितले, “लाइव्ह परफॉर्मन्ससाठी आयटम गर्ल 2.5 ते 10 लाखांपर्यंत फीस घेते. 70% कॅश त्या घेतात. आता त्यांच्यासाठीसुद्धा ही अडचण ठरत आहे."