मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पाकिस्तान भेटीवर टीका करणाऱ्या बॉलिवूड निर्माता अनुराग कश्यपवर आता चारही बाजूंनी टीका होण्यास सुरुवात झाली आहे. बॉलिवूडमधले अनेक जण अनुराग कश्यप यांच्याविरोधात टीका करु लागले आहेत. गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी देखील ट्विट करत अनुराग कश्यप यांना लक्ष्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिजीतने अनुराग कश्यप विरोधात ट्विट करत म्हटलं की, 'पीएम नरेंद्र मोदी यांनी आधी समजवून सांगण्याचा प्रयत्न केला नंतर लात मारली. तुम्ही रांगेत आहात. करण जोहरनंतर, महेश भट्ट आणि तुम्ही. यासोबतच त्यांनी दुसरं ट्विट करत म्हटलं की, बॉलिवूडला अँटी इंडिया ब्रिगेड आणि हाफिज सईदच्या मित्रांपासून वाचवण्याची गरज आहे.


अभिजीत ऐवढ्यावरच नाही थांबले तर, या प्रकरणात दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांना घेरत पाकिस्तानचा हिरो म्हटलं. 'मोदी तुम्ही देशाचा अभिमान आहात आणि आमचे पंतप्रधान आहात. तुम्ही पुढे जात राहा. आम्ही या अँटी इंडिया ब्रिगेड, अनुराग कश्यप, करण जोहर आणि महेश भट्ट यांना ठोकून टाकू.


करण जोहर दिग्दर्शित ऐ दिल है मुश्किल या सिनेमावर बंदी घालण्यावरुन वाद सुरु असतानाच निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाकिस्तानी भेटीवरुन त्यांच्यावर निशाणा साधला होता. ट्विटरवरुन अनुरागनं मोदींवर हल्लाबोल केला होता. यावर आता बॉलिवूडमधून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.