मुंबई : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती या सिनेमाच्या सेटवर अपघात झालाय. सूत्रांच्या माहितीनुसार, या अपघातात सेटवरील एकाचा मृत्यू झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरे कॉलनी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुकेश डाकिया असे या मृत व्यक्तीचे नाव आहे, तो पेंटिग काम करत असे. 


पद्मावतीच्या सेटवर पेंटिंगचे काम करत असताना तो पाच फुटाच्या उंचीवरुन खाली कोसळला. त्याला उपचारासाठी कोकिलाबेन रुग्णालयात नेले असता तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.