43 लाखांच्या नव्या नोटा घेऊन जाताना अभिनेत्याला अटक
क्राईम पेट्रोल या सीरियलमध्ये निगेटिव्ह रोल करणारा अभिनेता राहुल चेलानीला 43 लाख 60 हजार रुपयांच्या नव्या नोटा घेऊन जाताना पोलिसांनी पकडलं आहे. राहुल या नोटा इटारसीवरून होशंगाबादला घेऊन जात होता.
नवी दिल्ली : क्राईम पेट्रोल या सीरियलमध्ये निगेटिव्ह रोल करणारा अभिनेता राहुल चेलानीला 43 लाख 60 हजार रुपयांच्या नव्या नोटा घेऊन जाताना पोलिसांनी पकडलं आहे. राहुल या नोटा इटारसीवरून होशंगाबादला घेऊन जात होता.
इनोव्हा गाडीतून पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा घेऊन जाताना पोलिसांनी राहुलला अटक केली आहे. राहुल चेलानी हा अभिनेत्याबरोबरच बांधकाम व्यावसायिकही आहे. पोलिसांनी गाडीमध्ये असलेल्या राहुलबरोबरच आणखी दोघांना अटक केली आहे.
पकडलेले हे सगळे रुपये माझे आहेत. हे पैसे मी अभिनय आणि बांधकाम व्यवसायातून कमावले आहेत, असं राहुलनं पोलिसांना सांगितलं आहे. होशंगाबादमध्ये राहत असलेल्या मामाकडे हे पैसे घेऊन जात असल्याचंही राहुलचं म्हणणं आहे. पकडलेल्या या पैशांबाबत पोलिसांनी आयकर विभागाला माहिती दिली आहे. आयकर विभाग या सगळ्या प्रकाराची चौकशी करत आहे.