`राब्ता`मध्ये ३२४ वर्षांचा म्हातारा
सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेननचा आगामी चित्रपट `राब्ता` लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव एका ३२४ वर्षाच्या म्हाताऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
मुंबई : सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेननचा आगामी चित्रपट 'राब्ता' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव एका ३२४ वर्षाच्या म्हाताऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
काही दिवसांपूर्वी 'राब्ता'चे ट्रेलर रिलीज झाले त्यामध्ये राजकुमार रावची एक झलक दाखवण्यात आली आहे. त्याच्या या लुकसाठी चित्रपट निर्माता दिनेश विजान यांनी खास लॉस एँजलहून मेकप आर्टिस्ट बोलावला आहे. हा लूक बनविण्यासाठी त्याला ६ तास लागतात. तसेच या भूमिकेसाठी राजकुमार रावने आपल्या आवाजासोबत बॉडी लॅंग्वेजही बदलली आहे. राजकुमारच्या या लूकची सर्वत्र चर्चा चालू आहे.
या आधी राजकुमार रावचा 'ट्रॅप्ड' हा चित्रपट रिलीज झाला होता. परंतू तो बॉक्स ऑफिसवर आपला ठसा उमटवण्यात अपयशी ठरला. राजकुमार त्याच्या या लूकविषयी बोलताना म्हणाला की, 'मेकअपच्या दरम्यान मी खूप घामाघूम होतो. परंतू ही भूमिका खूप मजेशीर आहे. ही भूमिका करण्यासाठी मी आधीपासूनच उत्सूक होतो. ही भूमिका करताना मी खूप आनंद लूटला.'