पुणे : अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचे निधन झाले. भरत नाट्य मंदिरात प्रयोग सुरु असताना ह्दयविकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यांची अचानक रंगभूमीवरच एक्झिट झाली. त्या 44 वर्षांच्या होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील भरत नाट्य मंदिरात नाट्य त्रिविधा हा कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी अश्विनी एकबोटे कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. अश्विनी एकबोटे या नाट्य- सिने आणि नृत्यांगना म्हणून प्रसिद्ध होत्या. त्या गुणी कलाकार म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या पश्चात पती प्रमोद आणि मुलगा शुभंकर आहे.


एकबोटे यांचा नाट्यत्रिविधा हा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी भरत नाट्य मंदिरात सुरू होता. त्यांनी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात केली आणि त्या खाली कोसळल्या. रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास त्यांना ह्दयविकाराचा झटका आला. मात्र शरीरातील साखरेच्या वाढलेल्या प्रमाणामुळे ते कळून आले नाही. त्या रंगभूमिवर कोसळ्याने तिथेच बेशुद्ध झाल्या. त्यांना त्वरित पेरूगेटजवळील गोरे रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. 


एकबोटे यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला मोठा हादरा बसला आहे. रात्री ९.३० च्या सुमारास एकबोटे यांचे पार्थिव त्यांच्या हनुमान नगर येथील राहत्या घरी नेण्यात आले. त्यांच्या अचनाक जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीत आणि रंगभूमीवर शोकळला पसरली आहे. शरद पोंक्षे यांच्यासोबत त्यांनी अनेकवेळा काम केले.


त्यांचे गाजलेले सिनेमे


डेबू
महागुरु
बावरे प्रेम हे (2014)
तापटवाडी
दणक्यावर दणका
आरंभ (2011)
क्षण हा मोहाचा
हाय कमांड
एक पल प्यार का (हिंदी)


मालिका


दुहेरी (स्टार प्रवाह)
दुरावा
राधा ही बावरी
तू भेटशी नव्याने
कशाला उद्याची बात


नाटक


एका क्षणात
त्या तिघांची गोष्ट