करीना म्हणतेय, सैफला सोडून अर्जुनशी लग्न करावसं वाटतयं
करिश्मा कपूर आपला पती संजय कपूरशी वेगळी होतेय. दोघांच्या घटस्फोटाची केस सुप्रीम कोर्टापर्यंत गेलीये. आता करीनाने एका प्रमोशन इव्हेंटदरम्यान सैफ अली खानला सोडून अर्जुन कपूरशी लग्न करण्याचं मन करत असल्याचे सांगितले.
मुंबई : करिश्मा कपूर आपला पती संजय कपूरशी वेगळी होतेय. दोघांच्या घटस्फोटाची केस सुप्रीम कोर्टापर्यंत गेलीये. आता करीनाने एका प्रमोशन इव्हेंटदरम्यान सैफ अली खानला सोडून अर्जुन कपूरशी लग्न करण्याचं मन करत असल्याचे सांगितले.
सध्या करीना आणि अर्जुन त्यांच्या 'कि अँड का' या चित्रपटावरुन चर्चेत आहेत. महिलादिनाच्या दिवशी या चित्रपटातील एक गाणे रिलीज कऱण्यात आले. यावेळी करीनाला इंप्रेस करण्यासाठी अर्जुनने जेवणही बनवले.
रियल लाईफमध्ये अर्जुनला जेवण बनवता येत नाही मात्र करीनासाठी त्याने जेवण बनवले. हे पाहून करीना चांगलीच खुश झाली.
अर्जुनने गुडघ्यावर बसून करीनासाठी बनवलेले जेवण ऑफर केले. यावेळी करीना म्हणाली अर्जुनला इतकं काम करताना पाहून सैफला सोडून अर्जुनशी लग्न करावे असे वाटतेय.