मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याची बहिण हसीना पारकर यांच्यावर बनत असणाऱ्या सिनेमामध्ये काम करतेय. 'हसीना द क्वीन ऑफ मुंबई'ची सध्या शुटींग सुरु आहे. पण शुटींग दरम्यान सेटवर असं काही घडलं की श्रद्धाला रडू कोसळलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेटवर उपस्थित लोकांनाही नाही कळालं की, असं काय झालं की अचानक श्रद्धा रडू लागली. श्रद्धाला यावेळी रोखणं देखील कठीण झालं त्यामुळे दिग्दर्शक अपूर्वा लाखिया यांनी १ तासासाठी शुटींग थांबवली.


श्रद्धाचा भाऊ सिद्धांथ कपूर हा दाऊदची भूमिका करत आहे. सिद्धांथने सेटवर श्रद्धाला संभाळलं. पण यादरम्यान श्रद्धाला अश्रृ अनावर झाले. जेव्हा श्रद्धा आणि सिद्धांथ इमोशनल झाले तेव्हा सगळेच अवाक झाले. सगळे याच विचारात पडले की दोघे भाऊ-बहिण किती एकमेकांच्या जवळ आहेत. त्यानंतर काही काळ दोघांना एकटंच सोडण्यात आलं.