आदित्य पांचोलीला एक वर्षाची शिक्षा, 20 हजारांचा दंड
बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोलीला अंधेरी न्यायालयाने एक वर्षांची शिक्षा आणि 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोलीला अंधेरी न्यायालयाने एक वर्षांची शिक्षा आणि 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या शिक्षेविरोधात आदित्य पांचोली शिक्षेविरोधात सत्र न्यायालयात आव्हान देणार आहे. यामुळे त्याला वरच्या कोर्टाचा निर्णय लागेपर्यंत अंधेरी न्यायालयाने जामीन मंजूर केला.
आदित्य पांचोलीने 2005 साली सोसायटीच्या पार्किंगमध्ये एका व्यक्तीला मारहाण केली होती. याप्रकरणी प्रतिक नावाच्या व्यक्तीने आदित्य पांचोलीविरोधात गुन्हा दाखल केला होता.