मुंबई : पीकेच्या जबरदस्त यशानंतर तब्बल २ वर्षांनी बॉलीवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खानचा 'दंगल' बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'दंगल'चे सर्वच स्तरातून कौतुक होतेय. उत्तर प्रदेश आणि हरयाणामध्ये हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला होता. त्यानंतर आता उत्तराखंड आणि छत्तीसगढ़ सरकारनेही हा सिनेमा टॅक्स फ्री केलाय. 


हरियाणाचे माजी कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या मुली गीत आणि बबिता यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. 


शुक्रवारी रिलीज झालेल्या या सिनेमाने दोन दिवसांत तब्बल ६४.६० कोटींची धमाकेदार कमाई केलीये. विश्लेषकांच्या मते तीन दिवसांत हा सिनेमा १०० कोटींचा टप्पा गाठू शकतो.