मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन लग्नानंतर 'जज्बा' हा सिनेमा केला होता. त्यानंतर आता ती नव्या भूमिकेत दिसणार आहे. 'बादशाहो'मध्ये ती महाराणीच्या भूमिकेत दिसेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता अजय देवगन आणि विदयुत जामवाल स्टारर आणि मिलन लुथरिया दिग्दर्शित बॉलिवूडचा मोस्ट अवेटेड प्रोजेक्ट 'बादशाहो' या सिनेमाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. सिनेमात १९७५-७७ चा कालखंड दाखविण्यात येणार आहे. त्या काळातील कथानक पडद्यावर दाखविण्यात येणार आहे.


कोण आहे महाराणी?


विशेष म्हणजे ऐश्वर्या राय-बच्चन महाराणी गायत्री देवी यांच्यापासून प्रेरीत कॅरेक्टरमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. ऐश्वर्या राय गायत्री देवीची भूमिका करणार आहे.


तीन वेळा काँग्रेसच्या उमेदवाराला हरविणा-या गायत्री देवीची कहाणी या सिनेमाव्दारे रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे इंदिरा गांधींनी पुकारलेल्या आणी-बाणीला ही गायत्रीदेवींनी विरोध केला होता. त्यामुळे ऐश्वर्या पुन्हा एकदा पॉवरफूल रोलमध्ये दिसणार आहे.


कधी होणार सिनेमा प्रदर्शित?


ऐशचा अजून एक वेगळा अंदाज तिच्या चाहत्यांना बघायला मिळणार आहे. सिनेमाचं शूट या वर्षाच्या अखेरीस सुरु होणार असून २०१७च्या दिवाळीत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.