मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा आई बनणार आहे. यामुळेच तिनं मीडियापासून लांब राहणं पसंद केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपला 'बेबी बंप' लपवण्यासाठी ऐश्वर्या सध्या खूप प्रयत्न करताना दिसतेय. मी़डियाच्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या 'हाऊसफूल ३'च्या प्रीमियरमध्येही हाच प्रकार पाहायला मिळाला. 


जेव्हा सगळे सिनेकलाकार मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर पोज देण्यासाठी पोहचले तेव्हा यामध्ये ऐश्वर्या राय नव्हती. ती मीडियाच्या कॅमेऱ्यापासून लांबच राहणं पसंत करत होती. परंतु, काही फोटोग्राफर्सनं तिचे फोटो काढलेच. 


या फोटोंधून ऐश्वर्या आपला 'बेबी बंप' लवपण्याचा प्रयत्न करत असताना दिसतेय. ऐश्वर्यानं एका मोठी हॅन्डबॅग खांद्यावर टाकलेली होती. कॅमेऱ्यांचे फ्लॅश पडताच ऐश्वर्यानं आपली बॅग पोटासमोर धरली.... यामुळे तर चर्चेला आणखीनच वाव मिळाला. 


यापूर्वी २०११ साली अॅशनं आराध्याला जन्म दिला होता. आराध्या आता ५ वर्षांची झालीय आणि ऐश्वर्या आता ४२ वर्षांची आहे.