अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनच्या वडिलांचे निधन
बॉलीवूड अभिनेक्षी ऐश्वर्या राय-बच्चनच्या वडिलांचे निधन झालेय. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ऐश्वर्याचे वडील कृष्णराज राय यांनी अखेरचा श्वास घेतला.
मुंबई : बॉलीवूड अभिनेक्षी ऐश्वर्या राय-बच्चनच्या वडिलांचे निधन झालेय. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ऐश्वर्याचे वडील कृष्णराज राय यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या महिन्याभरापासून कृष्णराज राय यांच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वी त्याची प्रकृती अधिकच ढासळल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.
ऐश्वर्याच्या प्रवक्त्यांनी वेब पोर्टल पिंकव्हिला ही माहिती दिली. तीन आठवड्यांपूर्वी कृष्णराज राय यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.