मुंबई : फ्रान्समधील कान्स फेस्टीवलमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या रायने कान्समधील रेड कार्पेटचा एक महत्वपूर्ण नियम तोडल्याचं सांगण्यात येत आहे. काल 70 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या चौथ्या दिवशी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने रेड कार्पेटचा एक महत्त्वपूर्ण नियम तोडल्याची बाब समोर आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्रान्समध्ये सुरु असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींच्या लूकची जोरदार चर्चा सुरु आहे. 'राल्फ अ‍ॅण्ड रसो' यांनी डिझाइन केलेला लाल रंगाचा गाउन ऐश्वर्या राय  परिधान करून रेड कार्पेटवर उतरली होती. मात्र रेड कार्पेटवर सेलिब्रिटींनी लाल रंगाच्या ड्रेसमध्ये एंट्री करू नये असा नियम आहे, यामुळे ऐश्वर्याने लाल रंगाचा गाउन घालून केलेली एंट्री वादात आहे.


दरम्यान, ऐश्वर्याने चौथ्या दिवशी रेड कार्पेटवर एंट्री करताना सगळ्यांनाच आपल्या सौंदर्याने घायाळ केले. मोकळे केस सोडलेली ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत होती. लाल रंगाच्या गाउनवर तिने रुबी लावलेले डायमंड एअरिंग घातले होते. शिवाय या गाउनच्या रंगाशी मॅच होणारी लिपस्टिक तिचे सौंदर्य खुलविणारी होती. त्याचबरोबर डोळ्यांचे सौंदर्य वाढविण्यासाठी तिने डोळ्याला हेवी आईलशेस लूक दिला होता.


ऐश्वर्या गेल्या १६ वर्षांपासून कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत आहे. त्यामुळे ऐश्वर्या कान्सचे प्रत्येक नियम चांगल्या पद्धतीने जाणून आहे. अशात तिने कान्सचे नियम तोडत केलेली एंट्री वादग्रस्त ठरली आहे. वास्तविक ऐश्वर्याची ही एंट्री अनेकांना अचंबित करणारी होती. शिवाय तिचा ग्लॅमर अंदाजही अनेकांना आवडला, परंतु तिने नियमांचे उल्लंघन केल्याचीही यावेळी जोरदार चर्चा रंगली होती.