मुंबई : अजय-अतुल सैराट चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने अनेक ठिकाणी दिसून आले, तेव्हा लोकांनी अजय-अतुल यांना तुम्ही ही फिल्म प्रोड्यूस केलीय का?, तुम्ही का एवढे फिरतायत असा सवाल केला.


अजय-अतुल यांनी यावर सैराटच्या सक्सेस पार्टीत बोलतांना फिरकी घेत सांगितलं, सैराटमधील सल्या आणि बाळ्याला ज्याप्रमाणे काहीही माहित नव्हतं की आपण आर्ची आणि परशासोबत का पळतोय, तसं आमचं झालंय, आम्हालाही माहित नाहिय आम्ही का पळतोय, आम्ही सैराटमधील सल्या आणि बाळ्यासारखे आहोत.