मुंबई : आपल्या संगीताने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी जोडी म्हणजे गीतकार अजय-अतुल. सैराटमधील त्यांची प्रत्येक गाणी सुपरहिट झालीत. सध्या प्रत्येकाच्या तोंडी केवळ सैराटचीच गाणी ऐकायला मिळत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांनी संगीतबद्ध तसेच गायलेल्या झिंगाट या गाण्याने तर प्रेक्षकांना अक्षरश: झिंगायला लावलेय. केवळ मराठी चित्रपटातच नव्हे तर बॉलीवूडमध्येही त्यांनी आपला वेगळे स्थान निर्माण केलेय.


अजय-अतुल यांच्या लहानपणीचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या फोटोत शिरूर येथील बाळासाहेबांच्या सभेत पोवाडा गाताना चिमुकले अजय-अतुल दिसत आहेत.