लंडन : लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हल म्हणजेच एलआयएफएफच्या रेड कार्पेटवर अजय देवगन त्याची मुलगी नायसाबरोबर पोहोचला होता. अजय देवगन आणि त्याची पत्नी काजोलची मुलगी नायसा 13 वर्षांची आहे. रेड कार्पेटवर जायची नायसाची ही पहिलीच वेळ आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेवर्ल्ड सिनेमाजच्या एलआयएफएफच्या उद्घाटन सोहळ्याला हे दोघं गेले होते. या सोहळ्यासाठी अजय देवगननं काळ्या रंगाचे कपडे घातले आहेत, तर त्याच्या मुलीनं नेव्ही ब्लू रंगाचा ड्रेस घातला आहे. 


मुलीबरोबरचा हा फोटो अजय देवगननं शेअर केला आहे. महिलांचं सशक्तीकरण, माझी मुलगीच माझी शक्ती आहे, माझी ताकद आहे. रेड कार्पेटवर माझ्या शक्तीबरोबर चाललो असं अजयनं हा फोटो शेअर करताना म्हंटलं आहे.