मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा सिनेमा 'अकीरा' रिलीज झाला आहे. हा सिनेमा एक महिला केंद्रीत अॅक्शन ड्रामा सिनेमा आहे. अकीरा हा सिनेमा तमिळ सिनेमाचा रिमेक आहे. ए. आर. मुरुगदॉससोबत सोनाक्षीचा हा दुसरा सिनेमा आहे. याआधी तिने हॉलीडेः ए सोल्जर इज नेवर ऑफ ड्यूटी या सिनेमामध्ये काम केलं होतं. विशाल-शेखरने या सिनेमाला संगीत दिलं आहे. सिनेमातील गाण्याने सिनेमाची लढाई वाढवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेमाची कथा ही एका कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलीची आहे जिचं नाव अकीरा आहे. जी भ्रष्ट सिस्टमच्या विरोधात आवाज उठवते. सिनेमामध्ये सोनाक्षीचा जबरदस्त अॅक्शन सीन्स पाहायला मिळणार आहे. सोनाक्षीने खूप चांगल्याप्रकारे अॅक्शन सीन्स आणि स्टंट केले आहेत. अकीराला दुसऱ्यांसोबत अॅडजस्ट करतांना खूप त्रास होतो. तिचं वागणं तिची आई आणि भावासाठी चिंतेचा विषय बनतो. त्यामुळे नंतर तिला तिचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी जोधपूरहून मुंबई येथे पाठवण्यात आलं.


२९ वर्षीय अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला अकीरा सिनेमामध्ये अॅक्शन दृश्यांसाठी १२० दिवसांचं ट्रेनिंग देण्यात आलं. बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने या सिनेमाबाबत म्हटलं की, अकीरा सिनेमा माझ्य़ा करिअरमध्ये योग्य वेळेला आला. या सिनेमामध्ये सोनाक्षी एका वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळणार आहे.


शूटिंग शुरु होण्याच्या चार महिने आधी मिक्स्ड मार्शल आर्टमध्ये सोनाक्षीचं  ट्रेनिंग सुरु झालं. शूटिंगदरम्यान तिची ट्रेनिंग देखील सुरु होती. सिनेमामध्ये सोनाक्षी सिन्हाने जबरदस्त अॅक्टिंग केली आहे. अॅक्शन सीन असो की इमोशनल.. अकीराच्या भूमिकेत सोनाक्षीने प्राण टाकले. सोनाक्षीची मेहनत या सिनेमामध्ये दिसते.