मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या एअरलिफ्ट आणि हाऊसफूल 3 या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. या चित्रपटांच्या यशामुळे अक्षय कुमारचाही भाव चांगलाच वधारला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षयनं दिव्या खोसलाचा चित्रपट तब्बल 56 कोटी रुपयांना साईन केला आहे. दिव्यानं या आधीही अक्षयबरोबर अब तुम्हारे हवाले वतन साथीयो या चित्रपटात काम केलं आहे. दिव्याचे नुकतेच यारीया आणि सनम रे हे चित्रपट रिलीज झाले आहेत. 


अक्षय कुमार आणि दिव्यानं मात्र याबाबत अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अक्षय कुमारनं जॉली एलएलबी 2 या चित्रपटासाठी 42 कोटी रुपये घेतल्याचंही बोललं जात आहे. 42 दिवसांमध्येच या चित्रपटाचं शूटिंग संपवण्यात येणार आहे, म्हणजेच अक्षययनं या चित्रपटासाठी प्रत्येक दिवसासाठी एक कोटी रुपये घेतल्याची चर्चा आहे. वेलकम 3साठीही अक्षयनं तब्बल 50 कोटी रुपये मागितल्याचं कळत आहे.