मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षर कुमारने शहिदांच्या कुटुंबियांना मदत केली आहे. त्यांच्या कुटुंबियांना मदत पोहोचवण्यासाठी तो स्वत: जैसलमेरमधल्या पोकरणमधील लोंगासर गावात शहीद नरपतसिंह यांच्या परिवाराला येऊन भेटला. त्याने या कुटुंबियाला ९ लाखांची मदत केली. सीमा सुरक्षा दलातील जैसलमेरचे नॉर्थ सेक्टरचे  उपमहानिरीक्षक अमित लोढा यांनी २ दिवसांपूर्वी अक्षत्य कुमारला नरपतसिंह यांच्या परिवाराची माहिती दिली होती.
 
आसाममधील उल्फा उग्रवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात नरपतसिंह हे शहीद झाले होते. त्यानंतर त्यांची पत्नी आणि त्यांच्या भावासोबत अक्षय कुमारने फोनवर बातचीत केली. अक्षय कुमारने गुरुवारी शहीदाच्या पत्नीच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे जमा केले. पण काही तांत्रिक कारणांमुळे ते पोहोचले नाहीत.


शुक्रवारी मात्र ती रक्कम जमा झाली. अक्षय कुमार हा अनेकदा मदत करण्यासाठी पुढे येतो. पण त्याबाबत प्रसिद्धीची त्याला कोणतीही अपेक्षा नसते. त्याचं हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. याआधी अक्षयने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील मदत केली होती. याआधी अक्षयने ८० लाख रुपये सैनिकांच्या भविष्यासाठी जमा केले होते. अक्षय कुमारचे वडील हे देखील लष्करात होते.