VIDEO : अक्षयच्या `जॉली एलएलबी 2`चा ट्रेलर
अभिनेता अक्षय कुमारचा आगामी `जॉली एलएलबी 2`चा एक नवा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय.
मुंबई : अभिनेता अक्षय कुमारचा आगामी 'जॉली एलएलबी 2'चा एक नवा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय.
सव्वाशे करोड लोकसंख्या असलेल्या देशात केवळ 21 हजार जज असल्याचं सांगत या सिनेमाच्या ट्रेलरची सुरुवात होते... आणि मग आपल्याकडे आलेल्या एका केसला न्याय देण्यासाठी झटताना जॉली दिसतो... काय आहे ही केस? कुणाची? कशासाठी? हे तुम्हाला स्वत:लाच जाणून घ्यावं लागेल.
या सिनेमात अक्षयसोबत हुमा कुरेशीदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अर्शद वारसीच्या 'जॉली एलएलबी' या सिनेमाचा हा सिक्वेल असणार आहे.
'जॉली एलएलबी 2' प्रेक्षकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यात यशस्वी ठरतोय. हा सिनेमा येत्या 10 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.