मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी सुपर स्टार अक्षय कुमार आता १५ दिवस आपल्या फॅनला सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या १५ दिवसात अक्षय आपल्या फॅन्सपासून नाही तर आपल्या कुटुंब आणि फोनपासूनही दूर राहणार आहे.  नुकताच अक्षयने पत्नी ट्विंकल आणि मुलांसह साऊथ आफ्रिकेत नवे वर्ष साजरे केले. 


पण आता तो केरळमध्ये स्वतःसाठी वेळ देणार आहे. या ठिकाणी १५ दिवस तो मेडीटेशन करणार आहे. या दरम्यान तो सेलफोन, लॅपटॉप आणि शहरातील धावपळीपासून दूर राहणार आहे. 


मनशांतीसाठी तो स्वतःसोबत काही काळ घालविणार आहे.  केरळच्या कोच्ची शहरापासून अडीच तासांचे अंतर असलेल्या एका शांत ठिकाणाची त्याने निवड केली आहे. या ठिकाणी तो मेडिटेशन करणार आहे. पुढील १८ जानेवारीपर्यंत या ठिकाणी जंगलात राहणार आहे. 


या ठिकाणाहून परत आल्यावर तो आपला चित्रपट जॉली एलएलबी २ चे प्रमोशन करणार आहे. येत्या १० फेब्रुवारी रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.