अक्षय कुमारनं शेअर केला जॉली एलएलबी2 मधून डिलीट केलेला सीन
अक्षय कुमारच्या जॉली एलएलबी2 या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे.
मुंबई : अक्षय कुमारच्या जॉली एलएलबी2 या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. अक्षयचा हा चित्रपट प्रेक्षकांच्याही पसंतीला उतरला आहे. अक्षयनं या चित्रपटातून वगळण्यात आलेला एक सीन त्याच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे.
जॉली एलएलबी2 वर एवढं प्रेम केल्याबद्दल धन्यवाद. चित्रपटातला डिलीट करण्यात आलेला माझा सगळ्यात आवडता सीन शेअर करत असल्याचं अक्षयनं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या सीनमध्ये अक्षय कुमार, सौरभ शुक्ला आणि अनू कपूर पाहायला मिळत आहेत.