2017 च्या स्वातंत्र्यदिनाला अक्षयचा नवा चित्रपट, पोस्टरही केलं रिलीज
2017 च्या स्वातंत्र्य दिनाच्या आठवड्यामध्ये बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मुंबई : 2017 च्या स्वातंत्र्य दिनाच्या आठवड्यामध्ये बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अक्षय कुमारनंच ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. क्रॅक असं या चित्रपटाचं नाव आहे.
या चित्रपटाचं पोस्टरही अक्षय कुमारनं शेअर केलं आहे. नीरज पांडे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. याआधी अक्षयनं नीरज पांडेंबरोबर स्पेशल 26 आणि बेबी या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले होते.
अक्षयच्या 'क्रॅक'चं पोस्टर