मुंबई : अभिनेता अक्षय कुमार यांचा आगामी सिनेमा 'टॉयलेट एक प्रेम कथा' याचे शूटिंग संपले असून त्याची एक झलक पाहायला मिळाली आहे. निर्माता श्री नारायण सिंह यांच्या सिनेमात अक्षय कुमारसोबत भूमी पेडणेकर हिची मुख्य भूमिका आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षयने ट्विटरवर या सिनेमाची झलक दाखवून दिली आहे. एक फोटो अक्षयने अपलोड केलाय. हा सिनेमा 2 जूनला रिलीज होणार आहे. अक्षय आणि भूमी नवरा-बायकोच्या भूमिकेत नजर येत आहेत. भूमीने लाल रंगाचा लेहंगा, सोन्याचे दागिने परिधान केले आहेत. तर अक्षयने मस्टर्ड रंगाचा कोट आणि पॅंट परिधान केली आहे. तसेच डोक्यावर लाल रंगाचा फेटा आहे.


अक्षयने ट्विट करताना, toilet ek prem katha या सिनेमाचे शूटिंग संपल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सिनेमाची एक झलक तुमच्यासाठी पोस्ट करत आहे. या सिनेमात केशव आणि जया यांची एक प्रेम कहानी आहे. भूमी आणि अक्षयची ही नवी जोडी प्रथमच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.