मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्ट हिला नुकतंच एका वाईट प्रसंगातून जावं लागलं... आपल्याला न्यायला आलेला बॉडिगार्ड नशेत पाहिल्यानंतर आलियाचा पारा भलताच चढला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, आलिया तिचा कथित बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रा याच्या घरी त्याला भेटायला गेली होती. रात्री उशिरा 3 वाजल्याच्या सुमारास ती तिथून निघाली. त्यावेळी तिनं बॉडिगार्डला बोलावण्यासाठी त्याला फोन केला.


बऱ्याचदा फोन केल्यानंतरही बॉडिगार्डनं अगोदर तिचा फोन उचलला नाही... नंतर जेव्हा त्यानं फोन घेतला त्याचा आवाज वेगळा येत असल्याचं तिला जाणवलं. कारमध्ये बसल्यानंतर आलियाला आपला बॉडिगार्ड नशेत असल्याचं जाणवलं. 


घरी परतल्यानंतर आलियानं बॉडिगार्डला चांगलंच फैलावर घेतलं... तिनं तिची आई सोनी राझदान हिलाही यासंबंधात सांगितलं... त्यामुळे नाराज होऊन सोनी राझदान यांनी बॉडिगार्डला कामावरून काढून टाकल्याचं समजतंय.