मुंबई : अभिनेत्री आलिया भट्टला राजामौली यांचा बाहुबली 2 द कनक्लूजन हा सिनेमा खूप आवडलाय. हा सिनेमा पाहिल्यानंतर तिने तर प्रभाससोबत काम करण्याची इच्छाही व्यक्त केलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमासाठी केवळ एकच शब्द तो म्हणजे रॉक बस्टर...खूप आवडला. दरम्यान, एका चाहत्याने आलियाला विचारले की प्रभाससोबत काम करायला आवडेल का. यावेळी आलियाने त्याला उत्तर देताना म्हटले, नक्कीच मला काम करायला आवडेल. 


आलिया सध्या ड्रॅगन आणि गुल्ली बॉय या सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिच्या आगामी ड्रॅगन या सिनेमाबाबत ती फार उत्सुक आहे.