मुंबई : सेलिब्रिटींचं डाएट, त्यांचे एक्सरसाईज, त्यांचा फिटनेस फंडा, फिगर मेंटेन करण्याच्या टिप्स याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असते. आता सोशल मीडियामुळे या टिप्स फॅन्सबरोबर शेअर करता येतात. आलिया भटनंही तिचा एक्सरसाईज करतानाचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केलाय. आलियाचा उडता पंजाब हा सिनेमा रिलीज होतोय. त्यासाठीचा हा प्रमोशनल फंडा असण्याचीही शक्यता आहे.