कपिल शर्माच्या नव्या शोबद्दल जाणून घ्या सर्वकाही...
कपिल शर्माच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी... कपिल शर्मा लवकरच सोनी टीव्हीवर आपला नवीन शो घेऊ येत आहे.
मुंबई : कपिल शर्माच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी... कपिल शर्मा लवकरच सोनी टीव्हीवर आपला नवीन शो घेऊ येत आहे.
या शोचे नाव असणार आहे 'द कपिल शर्मा शो' हा शो येत्या २३ एप्रिलपासून सोनी टीव्हीवर टेलिकास्ट होणार आहे. याचे टाइमिंग शनिवार आणि रविवारी रात्री ९ वाजता असणार आहे.
कॉमेडी नाइट्स विथ कपिल' हा कलर्सवरील शो गेल्या महिन्यात वादामुळे बंद झाला.
या प्रकरणावर अभिनेता आणि विनोदी कलाकार कपिल शर्माने कमालीची मौन बाळगले आहे.
कलर्स चॅनलवर कपिलच्या ऐवजी कृष्णा अभिषेक 'कॉमेडी नाइट्स लाइव्ह' आणि 'कॉमेडी नाइट्स बचाओ' हे कार्यक्रम करीत आहे.