मुंबई : 'संस्कारी बाबुजी' म्हणून परिचित असलेले अभिनेते आलोक नाथ यांच्या मुलाला नुकतीच मुंबई पोलिसांनी 'ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह' प्रकरणात अटक केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवांग नाथ याच्यासोबत त्याच्या तीन मित्रही होते. यामध्ये दोन तरुणींचाही समावेश होता. आपल्या वाढदिवसाच्या पार्टीवरून ते घरी परतत होते. 


पोलिसांनी शिवांगला गाडी थांबवायला सांगितली तेव्हा गाडी थांबवण्याऐवजी शिवांगनं आपल्या गाडीचा वेग वाढवला... आणि तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या कारचा पाठलाग करत गाडी थांबवली... आणि बांद्र्याच्या सी व्ही रोडवर शिवांगला अटक केली. 


पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा शिवांग नशेत होता. शिवाय त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्सही नव्हतं. पोलिसांनी शिवांगवर गुन्हा दाखल केलाय तसंच त्याचं वाहनही जप्त करण्यात आलंय. 


शिवांगला 2,600 रुपये दंड आणि न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान उपस्थित राहण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आलाय.