मुंबई: अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या नमक हलाल या चित्रपटाला 34 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्तानं त्यांनी ब्लॉग लिहिला आहे. या ब्लॉगमध्ये बिग बींना नमक हलालमध्ये त्यांच्यासोबत काम केलेली अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्मिता ही एक मजबूत महिला होती, तिच्या मृत्यूमुळे इंडस्ट्रीचं खूप मोठं नुकसान झाल्याचं बिग बी म्हणाले आहेत. स्मिता ही इंडस्ट्रीसाठी वरदान होती, तिला आम्ही हरवून बसलो, अशी भावूक प्रतिक्रिया अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये दिली आहे. 


मंडी, बाजार आणि अर्थ यासारखे अभिनयाचा कस लागणारे चित्रपट स्मिता पाटील यांनी केले होते. तरीही स्मितानं प्रकाश मेहरांची ऍक्शन कॉमेडी असलेल्या नमक हलालमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.