मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यपचा आपल्यापेक्षा २१ वर्षांनी लहान असलेल्या गर्लफ्रेण्डसाठी जीव तिळातिळा तुटतोय. शुभ्रा शेट्टी असं त्याच्या गर्लफ्रेण्डचं नाव आहे. अनुराग कश्यप अमेरिकेतून सुट्टीवरुन आला, आणि पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गर्लफ्रेण्डला किस करतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. सुट्टीदरम्यान अनुराग न्यूयॉर्कमध्ये त्याच्या २२ वर्षांच्या मैत्रिणीसोबत फिरत होता,  आता अनुराग वजन कमी करणार असल्याची चर्चा आहे. मात्र हा खटाटोप सिनेमासाठी नाही, तर गर्लफ्रेण्डसाठी आहे. 


अनुराग असं किती किलो वजन कमी करणार आहे...


स्वत:पेक्षा २१ वर्षांने लहान असलेल्या गर्लफ्रेण्डसाठी अनुरागला वजन कमी करायचं आहे. काही वर्षांपूर्वी अनुरागचं कल्की कोचलिनसोबत घटस्फोट झाला होता.


मुंबईत परतल्यानंतर अनुराग आरामनगरमध्ये फिजीओला भेटला. ही जिम अनुरागच्या फॅण्टम फिल्म ऑफिसच्या जवळच आहे. ४३ वर्षीय अनुरागला २० किलो वजन कम करायचं आहे, फिट दिसण्यासाठी तो वजन कमी करत असल्याचं सांगण्यात येत आहे.


ओळख शुभ्राची


शुभ्रा अनुरागच्या फॅण्टम फिल्म्स या प्रॉडक्शन कंपनीत आहे. शुभ्रा मीडिया स्टुडंट होती. मुंबईच्या सेंट झेवियर कॉलेजमधून २०१४ मध्ये  तिने शिक्षण पूर्ण केलं. 


अनुराग आणि शुभ्राच्या अफेअरची चर्चा मागील वर्षी डिसेंबरमध्ये रंगली होती. अनुराग आणि शुभ्रा अनेक कार्यक्रम आणि पार्ट्यांणध्ये  एकत्र दिसले होते. डिझायनर मसाबाच्या संगीत सोहळ्यातही शुभ्रा उपस्थित होती. यावरुन शुभ्रा आणि अनुराग रिलेशनशिपमध्ये असून दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची चर्चा होती.


स्वत: खुद अनुरागने हा फोटो शेअर करुन लिहिलं होतं की, “Hottie at the wedding”. या फोटोत त्याने शुभ्रालाही टॅग केलं होतं.