मुंबई : सध्या चर्चेत असलेल कपल म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. त्यांचं ब्रेकअप होणं हा तर त्यांच्या चाहत्यांसाठी एक अनपेक्षित धक्काच होता. त्यांनी एकत्र यावं, अशी त्यांच्या फॅन्सची आजही इच्छा असल्याचं वाटतंय. पण, आता मात्र त्यांची ही इच्छा अपूर्णच राहणार असं दिसतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बॉलिवूड लाइफ डॉट कॉम' वेबसाईटनं देलेल्या माहितीनुसार, अनुष्काला आता विराटच्या प्रेमात पडण्यात रस उरलेला नाही. विराटला आणि त्यांच्या नात्याला आणखी एक संधी देण्याची अनुष्काची इच्छा नाही. तिला जे काही झालं ते मागे सारुन पुढे जाण्याची इच्छा आहे. 


खरं तर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यानंतर विराट आणि अनुष्कावर होणाऱ्या विनोदांवर विराट भडकला होता. त्याने एक पोस्टही सोशल मीडियावर टाकली होती. त्याच्या या पोस्टमुळे तो आणि अनुष्का एकत्र येणार अशा चर्चा रंगल्या होत्या. पण, त्या चर्चांमध्ये काहीच अर्थ नव्हता असं आता दिसतंय.