मुंबई : अनुष्का शर्मा स्टारर फिलौरी या सिनेमाची निर्मिती भारताचा कर्णधार विराट कोहलीने केल्याच्या चर्चांना अखेर अनुष्काने पूर्णविराम दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावरील हे रिपोर्ट फेटाळून लावताना अनुष्का म्हणाली, काही तरी लाज बाळगा. फिल्लौरी या सिनेमाची निर्मिती फॉक्स स्टार हिंदी आणि क्लीन स्लेट फिल्म्सने केलीये. त्यामुळे या सिनेमाच्या निर्मितीबाबत जी काही चुकीची माहिती जे कोणी पसरवतेय त्यांनी ती सुधारावी. 


एका प्रसिद्ध वेबसाईटने अनुष्काच्या फिलौरी या सिनेमाची निर्मिती विराट कोहली करत असल्याचा दावा केला होता. या वृत्तानंतर अनुष्का चांगलीच भडकली.