नवी दिल्ली : अभिनेत्री अनुष्का शर्मा टीम इंडियाचा टेस्ट फॉरमॅटचा कर्णधार विराट कोहलीसाठी एक खास गोष्ट करु इच्छिते.  अनुष्का आणि विराटची यांच्यातील नातं आता पुन्हा नव्याने सांगण्याची गरज नाही. काही दिवसांपूर्वी त्यांच्या ब्रेकअपच्या ही बातम्या आल्या होत्या पण आता ते पुन्हा एकत्र झाले आहेत. दोघांना फिल्मसेट्स, डिनर आणि एयरपोर्टवर अनेकदा एकत्र पाहिलं गेलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुष्काला आता विराटसाठी एक खास गोष्ट करायची आहे. अनुष्काला तिच्या अपकमिंग सिनेमा 'सुल्तान'ची स्क्रीनिंग विराटच्या उपस्थितीत करायची आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार १८ वर्षीय अनुष्कासाठी 'सुल्तान' सिनेमा खूपच महत्त्वाचा आहे. अनुष्का विराटसाठी सुल्तानचं खास स्क्रीनिंग ठेवू इच्छिते.


'अनुष्काने या सिनेमामध्ये एका पहेलवानाची भूमिका साकारली आहे. या रोलसाठी तिने ट्रेनिंग घेतली होती. विराटसह सगळ्याच जवळच्या लोकांना तिला तिने केलेली ही भूमिका दाखवायची आहे. त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया तिला घ्यायच्या आहेत. सुरुवातीला तिला फक्त विराटसाठी स्पेशल स्क्रीनिंग ठेवायची होती पण अनुष्का आता टीम इंडियातील विराटच्या काही जवळच्या खेळाडूंना देखील आमंत्रित करण्याच्या विचारात आहे.


'सुल्तान' सिनेमाची निर्माता कंपनी यशराज फिल्म आपल्या सिनेमांचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवत नाही पण अनुष्काच्या आग्रहामुळे स्पेशल स्क्रीनिंग फिल्मच्या रिलीजच्या दिवशी किंवा त्याआधी ठेवली जावू शकते.