मलाईकानंतर अरबाझच्या आयुष्यात रोमानियन गर्लफ्रेंड
बॉलिवूड अभिनेत्री मलाईका अरोरा आणि अरबाझ खान विभक्त झाल्यानंतर अरबाझच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची नवी बहार आलीय.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलाईका अरोरा आणि अरबाझ खान विभक्त झाल्यानंतर अरबाझच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची नवी बहार आलीय.
मलाईकापासून वेगळं झाल्यानंतर अरबाझ सध्या एका रोमानियन मुलीला डेट करतोय... अरबाझनं हे जाहीररित्या सांगतलंय हे विशेष...
'डीएनए'ला दिलेल्या मुलाखतीत अरबाझनं आपण 'एलेक्झेंड्रा' या रोमानियन मुलीच्या प्रेमात पडल्याची जाहीर कबुली दिलीय. 'अलेक्झेंड्रा आणि माझी भेट गोव्यात झाली होती... तिचं स्वत:च रेस्टॉरन्ट आहे... आणि मी तिला डेट करतोय' असं अरबाझनं बेधडकपणे सांगितलंय.
अरबाझ आणि मलाईका यांचा 1998 मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर तब्बल 18 वर्षांनी दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतलाय.