मलाइकापासून अरबाज लवकरच घेणार घटस्फोट
आपण आणि मलायका अरोरा लवकरच घटस्फोट घेणार असल्याचं अरबाज खानने एका मुलाखती दरम्यान म्हटलं आहे, यामुळे मलायका आणि अरबाजचच्या घटस्फोटासंदर्भात सुरू असणाऱ्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
मुंबई : आपण आणि मलायका अरोरा लवकरच घटस्फोट घेणार असल्याचं अरबाज खानने एका मुलाखती दरम्यान म्हटलं आहे, यामुळे मलायका आणि अरबाजचच्या घटस्फोटासंदर्भात सुरू असणाऱ्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
मलायका आणि मी आता एकत्र राहत नाही. लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे अरबाडने एका मुलाखतीदरम्यान स्पष्ट केले आहे.
अरबाज खानने आज आम्ही वेगळ झालो असल्याची कबूली दिली आहे. तो एका पत्रकार परिषदेत बोलत होता. त्यावेळी त्याने सांगितले. तो म्हणाला, आम्ही दोघे सध्या एकत्र राहत नाही, लवकरच घटस्फोट घेतला जाईल.
अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या घटस्फोटाच्या बातम्या जानेवारीच्या अखेर आल्या होत्या. दोघांनी आपले १७ वर्षे जूने नाते संपवण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त माध्यमात झळकत होते. मात्र, मार्चच्या अखेरपर्यंत त्यांनी यावर मौन बाळगले होते.