मुंबई : अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांचा हा मोबाईल नंबर आहे, असा मेसेज जर तुम्हाला व्हॉटसअॅपवर आला तर तो खोटा मेसेज आहे असं समजा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण सैराटच्या प्रिमिअर शो वेळी काही पत्रकारांनी रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरकडे मोबाईल नंबर मागितला होता. 


पण आश्चर्य म्हणजे रिंकू आणि आकाश यांच्याकडे मोबाईल तेव्हा तरी नव्हता. त्यामुळे व्हॉटसअॅपवरील मेसेजवर विश्वास न ठेवलेलाच बरा. रिंकू आणि आकाशचा हा मोबाईल नंबर आहे, असा मेसेज जर तुम्हाला आला तर तो तुम्ही न डायल केलेलाच बरा.