मंडावा : बॉलीवूड अभिनता अर्जुन कपूरने साखरपुडा केलाय. त्याने अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्याशी साखरपुडा केलाय. सगळ्या विशेष बाब म्हणजे हा साखरपुडा राजस्थानच्या मंडावा येथे झालाय. यांच्या साखरपुड्यात प्रमुख पाहुणे होते तेथील गावातील नागरिक.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हीही हे वाचून हैराण झालात ना. दरम्यान हा साखरपुडा रीअल नाही तर रील लाईफमध्ये झालाय. मोहित सुरी दिग्दर्शित हाफ गर्लफ्रेंडचे शूटिंग सध्या मंडावा येथे सुरु आहे. 


शुक्रवारी अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या साखरपुडा सोहळ्याचे शूटिंग पार पडले. हा साखरपुडा पूर्णपणे पारंपारिक पद्धतीने करण्यात आला. यावेळी गावातील नागरिक शूटिंग पाहण्यासाठी उपस्थित होते.