किर्तीमान `बाहुबली २`चा कमाईचा आणखी एक रेकॉर्ड
भारतीय सिनेमाच्या इतिहासात सर्वात यशस्वी म्हणून `बाहुबली 2` चं नाव आता जोडलं गेलंय. या सिनेमाच्या नावावर प्रत्येक आठवड्याला नवंनव्या रेकॉर्डची भर पडतंच चाललीय.
मुंबई : भारतीय सिनेमाच्या इतिहासात सर्वात यशस्वी म्हणून 'बाहुबली 2' चं नाव आता जोडलं गेलंय. या सिनेमाच्या नावावर प्रत्येक आठवड्याला नवंनव्या रेकॉर्डची भर पडतंच चाललीय.
'बाहुबली २ - द कन्क्लुजन'नं जगभरात तब्बल १५०० करोड रुपयांचं कलेक्शन केलंय. उल्लेखनीय म्हणजे, आत्तापर्यंत एखाद्या भारतीय सिनेमानं १००० करोड रुपयांची कमाई केल्याच्या रेकॉर्डनंतर आता १५०० करोड रुपयांचा रेकॉर्डही 'बाहुबली २'च्या नावावर जमा झालाय.
प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या २० दिवसांत ही कमाई 'बाहुबली २'नं करून दाखवलीय... हा देखील आणखी एक रेकॉर्डच म्हणावा लागेल. जगभरात 'बाहुबली २'नं १,५०२ करोड रुपयांची कमाई केलीय. ही कमाई सर्व भाषांमध्ये मिळून आहे. बॉलिवूड ट्रेड अॅनलिस्ट रमेश बाला यांनी ट्विटरवरून हे आकडे शेअर केलेत.
'बाहुबली २'च्या हिंदी व्हर्जननंही रेकॉर्डतोड कमाई केलीय. बॉक्सऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, सलग तिसऱ्या आठवड्यात सिनेमानं ६७.२५ करोड रुपयांचं नेट कलेक्शन केलंय. प्रदर्शिनानंतर याची आत्तापर्यंतची एकूण कमाई ६३३ करोड रुपये आहे.
२८ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमात प्रभास, राणा दग्गुबाती, अनुष्का शेट्टी, तमन्ना, राम्या, कृष्णनन आणि सत्यराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत.